शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

करोडपतीची पत्नी १३ वर्षे लहान ड्रायव्हरसोबत पळाली, लोणावळा-खंडाळा फिरली आणि पैसे संपताच घरी परत आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:47 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्या प्रियकरासह घरातून ४७ लाख रुपये घेऊन पसार झाली होती. सुमारे महिनाभर प्रियकरासोबत फिरल्यानंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली. तसेच पोलीस ठाण्यात जात तिने जबाबही नोंदवला आहे.

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्या प्रियकरासह घरातून ४७ लाख रुपये घेऊन पसार झाली होती. सुमारे महिनाभर प्रियकरासोबत फिरल्यानंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली. तसेच पोलीस ठाण्यात जात तिने जबाबही नोंदवला आहे.या महिलेने तिला तिच्या पतीसोबत राहायचे असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या पतीनेही तिला सोबत ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पोलिसांनी ३४ लाख रुपये आधीच जप्त केले आहेत. मात्र या महिलेचा प्रियकर असलेला ऑटो ड्रायव्हर अजूनही फरार आहे.  खजराना पोलीस ठाण्याचे सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी खजराना परिसरातील एका प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी १३ वर्षे लहान ऑटो ड्रायव्हरसोबत पळून गेली होती. जाताना तीन घरातून ४७ लाख रुपये घेऊन गेली. सदर प्रॉपर्टी ब्रोकर कोट्यधीश असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपींनी या पैशांमधील ३४ लाख रुपये मित्रांना दिले गेले होते. ऑटोचालकाचा मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान यांच्याकडून हे पैसे पोलिसांनी आधीच जप्त केले होते. पोलिसांनी महिला आणि ऑटो ड्रायव्हरला ताब्यात घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. मात्र दोघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर सोमवारी रात्री उशिरा सदर महिला स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा ही महिला खजराना पोलीस ठाण्यात पोहोचली जिथे बराच वेळ तिची चौशकी करण्यात आली. महिलेने सांगितले की, ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या स्विफ्ट डिझायर टॅक्सीमधून सदर महिला प्रियकरासोबत पीथमपूर येथे पोहोचले. त्यानंतर जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, बडोदा आणि सूरतपर्यंत प्रवास केला. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर सदर महिला परत घरी आली. पोलिसांनी या घटनेच्या काही दिवसांनंतर टॅक्सी ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीमध्ये ते पीथमपूरमध्ये गेल्याचे समजले. तेथून बसमधून जावरा येथे पोहोचले. तिथून ते फिरत फिरत परत इंदूर येथे आले.

सदर महिलेपेक्षा तिचा प्रियकर तेरा वर्षांनी लहान आहे. मात्र असे असूनही ती त्याच्या प्रेमात पडली आणि ऑटोवाल्यासोबत पळून गेली. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिचा छळ करत असे. त्यामुळे मी घरातून पळाले. मात्र मी आता पतीसोबत राहू इच्छित आहे. दरम्यान, या महिलेचा पतीही तिच्यासोबत राहू इच्छितो. दरम्यान ही महिला सोबत नेलेले दागिने परत घेऊन आली आहे. मात्र तिने नेलेले पैसे खर्च झाले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश