तारापूर MIDC इथं ३६ लाख किंमतीचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त; अंधेरी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 17:36 IST2025-06-11T17:36:48+5:302025-06-11T17:36:48+5:30

सदर कारचालक फरहान खान हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस दप्तरी नोंद असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mephedrone drugs worth 36 lakhs seized at Tarapur MIDC; Andheri police take action | तारापूर MIDC इथं ३६ लाख किंमतीचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त; अंधेरी पोलिसांची कारवाई

तारापूर MIDC इथं ३६ लाख किंमतीचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त; अंधेरी पोलिसांची कारवाई

हितेन नाईक 
पालघर - मुंबई अंधेरी पोलिसांनी तारापूर औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मधील एका कारखान्यावर छापा टाकून  36 लाख 57 हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) या अमली साठा सह अन्य ऐवज जप्त केला. या प्रकरणी तीन आरोपींना  ताब्यात घेण्यात आले आहे.सध्या पालघर मधील औद्योगिक वसाहत किंवा ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणावर मेफेड्रीन बनविण्याचे कारखाने छुपा मार्गाने उभारले जात असून ह्या प्रकरणात उच्चशिक्षित तरुणांचा वाढता सहभाग चिंतेचे कारण ठरत आहे.

मुंबई येथील अंधेरी एमआयडीसी परिसरात अंधेरी पोलिसांनी फरहान गुलजार खान या एका संशयित कारचालकाला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून २ लाख 80 हजार रुपये किमतीचा 71 ग्राम मेफेड्रिन साठा जप्त करण्यात आला होता. सदर कारचालक फरहान खान हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस दप्तरी नोंद असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे मिळालेल्या मेफेड्रिन बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालघर येथील प्रतीक सुदर्शन जाधव या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 8 लाख 60 हजार रुपये किमतीचे 215 ग्रॅम मेफेड्रिन जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मेफेड्रीन ह्या अमली पदार्थाचे बेकादेशीरपणे उत्पादन करून त्याचा पुरवठा करणारा बोईसर येथील विजय खटके या उच्चशिक्षित तिसऱ्या आरोपीला मुंबई पोलिसानी ताब्यात घेतले. 

विजय खटके ह्या  आरोपी ने बीएससी केमिस्ट्री पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून तारापूर एमआयडीसी येथील एका फार्मासिटिकल कंपनी तो कामाला आहे. त्याच कंपनीत तो मेफेड्रीन हे अंमली पदार्थ बनवून बाहेर विक्रीसाठी पाठवीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडून पोलिसांनी ११ लाख २० हजार रुपये किमतीचे 280 ग्रॅम मेफेड्रिन जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपीकडून एकूण 566 ग्राम वजन असलेले 22 लाख 66 हजार रुपये किमतीचे मेफेड्रिन, दोन कार आणि सहा मोबाईल असा एकूण 36 ला 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या तिन्ही आरोपींना अंधेरी न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याप्रकरणी अंधेरी पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश गुरव हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mephedrone drugs worth 36 lakhs seized at Tarapur MIDC; Andheri police take action