शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Crime News: सोशल मीडियावर भेट, मग लव्ह मॅरेज, तीन महिन्यांनंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:32 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिंघानिया यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनीही सुमारे तीन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. ऑनलाईन साईट्सवर या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर या प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये झाले होते. विवाहानंतर नवदाम्पत्य परदेशात फिरायलाही गेले. परदेशात असतानाच दोघांममध्ये काही वाद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हल्लीच त्यांची पत्नी रुची ही कुणालाही काही न सांगता घरातून गायब झाली. धक्कादायक बाब म्हणजे ती गायब झाल्यापासून घरातील लाखो रुपयांचे दागिनेही गायब झाल्याचे  समोर आले. आता व्यापाऱ्यासह स्वत: पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शहरातील अत्यंत पॉश परिसरामध्ये गणना होणाऱ्या शांतीनिकेतनमध्ये राहणाऱ्या नितेश सिंघानिया यांची ओळख सोशल मीडियावरून उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या रुची हिच्याशी झाली होती. दोघेही आधीपासून विवाहित होते. मात्र जोडीदारांसोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी घटस्फोट घेतलेला होता. दरम्यान, या दोघांमध्ये झालेली ऑनलाईन मैत्री हळुहळू प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. काही दिवसांनंतर युरोपला गेले असताना या दोघांमध्ये काही वाद झाला. मात्र हे भांडण तेवढ्यावरच संपल्याचे व्यापाऱ्याला वाटले होते.

पण इंदूरला आल्यानंतर काही दिवसांनी रुची गायब झाली. व्यापाऱ्याला जेव्हा याबाबतची कुणकूण लागली, तेव्हा त्याने सातत्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने फोन उचलणेसुद्धा बंद केले. व्यापाऱ्याने जेव्हा घरातील दागिन्यांचा शोध घेतला तेव्हा तेही गायब असल्याचे निष्पन्न झाले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे. त्यानंतर नितेश याने लसुडिया पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंघानिया यांनी तक्रार दिली होती. त्याआधारावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारदाराने पत्नीबाबत संशय घेतला आहे. आता या प्रकरणी अधिक माहिती घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया