शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

प्रेयसी आणि तिच्या पतीचा खेळ केला खल्लास, चिमुकली म्हणाली - मामानेच आई-बाबांना मारलं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:34 IST

बाहेरील आणखीही काही तरूण घरात येत असल्याने समीर जावेदावर नाराज होता. यावरून अनेकदा समीरचा प्रेयसी आणि तिच्या पतीसोबत वादही झाला होता. 

मेरठमध्ये एका प्रियकराने पाच मिनिटात प्रेयसी आणि तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समीर असं या आरोपीचं नाव असून त्याने आधी दोघांच्याही कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिश्रित केलं आणि नंतर धारदार हत्याराने दोघांची हत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, समीर हा त्याची प्रेयसी जावेदाचा मानलेला भाऊ म्हणून तिच्या पतीच्या घरी नेहमी येत होता. बाहेरील आणखीही काही तरूण घरात येत असल्याने समीर जावेदावर नाराज होता. यावरून अनेकदा समीरचा प्रेयसी आणि तिच्या पतीसोबत वादही झाला होता. 

दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी एसएसपी, एसपी सिटी, एसओजी आणि पोलीस स्टेशनने मंगळवारी दिवसभर चौकशी केली. जावेदाची मुलं समीरला मामा म्हणत होते. समीर नेहमीच जावेदाच्या आणि तिच्या मुलांसाठी खाण्या-पिण्याच्या वस्तू घरी आणत होता. इतकंच काय तर गेल्या सहा महिन्यांपासून परिवाराचा खर्चही समीरच करत होता. स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितलं की, जावेदा आणि समीर यांच्या अनैतिक संबंध होते. (हे पण  वाचा : बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...)

जावेदासोबत समीरचं प्रेम प्रकरण होतं तर त्याने तिला का मारलं? पोलिसांनी या प्रश्नाला धरूनच प्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा अशी माहिती समोर आली की, जावेदाच्या घरी इतरही काही तरूण येत-जात होते. ज्यावरून समीर नाराज होता. तरीही तिने काही ऐकलं नाही.

त्यानंतर समीरने प्लॅन करून जावेदा आणि तिचा पती आबादची हत्या केली. आबाद आणि जावेदाला मारण्यासाठी समीरला केवळ ५ मिनिटे लागली. आधी त्याने आबादचा गळा कापला आणि नंतर दुसऱ्या  रूममध्ये मुलांसोबत झोपलेल्या जावेदाचा गळा कापला. यावेळी तिची मुलगी सानिया उठली होती. तिला त्याने धरून आपटलं होतं. (हे पण वाचा : धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर)

दाम्पत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. एसएसपी प्रभाकर चौधरी म्हणाले की, आरोपी समीरचा शोध घेतला जात आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल. एसएसपीने जावेदाच्या तिन्ही मुलांची वेगवेगळी चौकशी केली. घटनेची साक्षीदार सानियाने सांगितलं की, समीर मामाने आई आणि बाबाला मारलं.

जावेदाची एक वर्षाआधीच समीरसोबत भेट झाली होती. ती एका फॅक्टरीमध्ये बॉटल सफाईचं काम करत होती. एक दिवस समीर जावेदाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. त्यानंतर तो जेव्हाही संधी मिळायची जावेदाच्या घरी जात होता. एक दिवस पती आबादने दोघांना घराच्या टेरेसवर पाहिलं. पतीने विचारल्यावर जावेदाने समीरचा परिचय मानलेला भाऊ म्हणून करून दिला. समीरनेही आबादला बाबा म्हणून बोलवणं सुरू केलं होतं. त्यानंतर समीर कधीही घरी येत होता. त्याच्याकडे पैसेही होते. तो नेहमीच मुलांसाठी खायला आणत होता. सोमवारी रात्री तो चाउमीन, कोल्ड ड्रिंकसहीत बरंच काही घेऊन आला होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी