शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

औषधी निर्माण अधिकाऱ्याने घेतली दोन हजारांची लाच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 21:45 IST

प्रसुती रजेचे बिल मंजुरी प्रकरण; एसीबीची कारवाई 

सिरोंचा (गडचिरोली) - तालुक्यातील नर्सिंहपल्ली येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत महिला कर्मचाऱ्याकडून प्रसुती रजेचे बिल मंजूर करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. गडचिरोलीतीललाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.

श्रीनिवास व्यंकटय्या गटला (वय - ४६) असे त्या लाचखोर कर्मचाºयाचे नाव आहे. तो मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मात्र सध्या त्याच्याकडे सिरोंचा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील लिपिक पदाचा प्रभार आहे. नर्सिंहपल्ली आरोग्य उपकेंद्रात कार्यरत महिला कर्मचा ऱ्याचे प्रसुती रजेचे बिल मंजूर करून ते काढण्यासाठी त्याने २ हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तो एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला. 

दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागGadchiroliगडचिरोलीArrestअटक