पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवघेणं ठरलं; मारहाणीत महिलेचा मृत्यू

By मनोज शेलार | Updated: April 13, 2023 19:43 IST2023-04-13T19:43:19+5:302023-04-13T19:43:28+5:30

गंभीर दुखापत झाल्याने सिदाबाई वसावे यांचा मृत्यू झाला तर सेमट्या पारशी वसावे हे देखील गंभीर जखमी झाले.

Mediation between husband and wife became fatal; Woman dies in beating | पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवघेणं ठरलं; मारहाणीत महिलेचा मृत्यू

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवघेणं ठरलं; मारहाणीत महिलेचा मृत्यू

नंदुरबार : पती-पत्नीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना भांग्रापाणी, ता. अक्कलकुवा येथे १२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध मोलगी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिदाबाई सेमट्या वसावे (६०) रा.भांग्रापाणी, ता.अक्कलकुवा असे मयत महिलेचे नाव आहे. तर वसंत होमा वसावे (३५) रा.भांग्रापाणी असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनुसार, वसंत होमा वसावे हा त्यांची पत्नी व मुलांना मारहाण करीत होता. त्यामुळे शेजारधर्म म्हणून सिदाबाई व तिचे पती सेमट्या वसावे हे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी संतापात असलेल्या वसंत याने पती व मुलांसह सिदाबाई व सेमट्या यांनाही सिलिंग फॅनच्या मोटारसह पाइपने चेहऱ्यावर व डोक्यावर बेदम मारहाण केली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने सिदाबाई वसावे यांचा मृत्यू झाला तर सेमट्या पारशी वसावे हे देखील गंभीर जखमी झाले. याबाबत किरता सेमट्या वसावे यांनी फिर्याद दिल्याने वसंत होमा वसावे यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहे.

Web Title: Mediation between husband and wife became fatal; Woman dies in beating