शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीजवळ २४६ कोटींचे ‘एमडी’ जप्त, कारखाना उद्ध्वस्त, मुंबईच्या पाेलिस पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 07:39 IST

अंदाजे १०० किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २४६ कोटी असल्याचे सांगण्यात आले.

कवठेमहांकाळ : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंदाजे १०० किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २४६ कोटी असल्याचे सांगण्यात आले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती नीरज उबाळे यांना मिळाली. त्यांच्यासह मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले आहे. इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. मुंबई पाेलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे शंभर किलाे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. दरम्यान, या कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ तालुक्यातील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले.मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी हाेते. 

मिरजेत तीन किलो गांजा जप्त मिरज (जि. सांगली) पोलिसांनी गांजा विक्रेत्यास पकडून तीन किलो गांजा, दुचाकी असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आशुतोष निशिकांत देवकुळे (वय ३५, रा. तासगाव) यास अटक केली आहे. आशुतोष देवकुळे हा त्याच्या पिशवीत ३ किलो १०० ग्रॅम गांजा घेऊन आंबेडकर उद्यानाजवळ आला होता. देवकुळेकडून ७७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी