MD drugs worth Rs 50 lakh seized from woman; Anti-narcotics team action | महिलेकडून ५० लाखांचं एमडी ड्रग्स जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

महिलेकडून ५० लाखांचं एमडी ड्रग्स जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

ठळक मुद्देआता कुर्ला परिसरातील सबिनाला येथे तब्बल ५० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. 

मुंबई शहरात अमली पदार्थासंबंधी दिग्गज अभिनेत्री आणि अभिनेत्यांची एनसीबीने चौकशी केली गेली. त्यातच मुंबईतील बऱ्याच ड्रग्ज तस्कर आणि पेडलर्स यांना अटक करण्यात आली. तसेच आता कुर्ला परिसरातील सबिनाला येथे तब्बल ५० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. 

ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने केली. जप्त केलेल्या या ड्रग्जचे वजन एकूण ५०३ ग्रॅम आहे.  या कारवाईत पोलिसांनी सबिना खान या महिलेला अटक केली आहे. कुर्ला परिसारातील सबिनाकडून एमडी या ड्रग्जची तस्करी होत असल्याचे मुंबई पोलिसांना माहिती समाजताच पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधीपथकाने जप्तीची कारवाई करत कुर्ला परिसारातून ५०३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने सबिना खान या महिला आरोपीला अटक केली. या ड्रग्जची किंमत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत डीआरआय (महसूल गुप्तचर विभाग) विभागाने पाच दिवसांपूर्वी अशीच एक मोठी कारवाई केली होती. या कारवाईत डीआरआय विभागाने तब्बल १८ कोटींचे कोकेन हस्तगत केले होते. यावेळी डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पश्चिम आफ्रिकेच्या एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती.

Web Title: MD drugs worth Rs 50 lakh seized from woman; Anti-narcotics team action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.