शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:27 IST

या बांधकाम व्यावसायिकाची माहिती पुजारीला देणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रिक्‍स (21) याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली होती. 

ठळक मुद्देपुजारी डिसेंबर 2018 पासून या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत असे.ओशिवरा बस डेपोसमोर राहणारा विल्यम ही माहिती पुजारी टोळीचा मुंबईतील प्रमुख आकाश शेट्टीपर्यंत पुरवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी रॉड्रिक्‍सला अटक केली.

मुंबई - गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला दूरध्वनीवरून धमकावून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी आज कुख्यात गुन्हेगार  रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या बांधकाम व्यावसायिकाची माहिती पुजारीला देणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रिक्‍स (21) याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली होती. पुजारी डिसेंबर 2018 पासून या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत असे. या बांधकाम व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पुजारीने त्याचा भाऊ व वहिनीलाही धमकावण्यास सुरुवात केली. बांधकाम व्यावसायिकाचा परदेशात शिकणारा पुतण्या भारतात आल्यानंतर त्याला सोडले नाही, त्याला देखील धमकावण्यात आले. त्यामुळे गोरेगाव परिसरात राहणारी व्यक्तीच या बांधकाम व्यावसायिकाबाबतची माहिती पुजारी टोळीपर्यंत पोहोचवत असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तपासादरम्यान, ओशिवरा बस डेपोसमोर राहणारा विल्यम ही माहिती पुजारी टोळीचा मुंबईतील प्रमुख आकाश शेट्टीपर्यंत पुरवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी रॉड्रिक्‍सला अटक केली. त्याच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार करण्याचीही प्रक्रिया सुरू होती. खंडणी मागितल्याप्रकरणी पुजारी व शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शेट्टीलाही अटक करण्यात आली होती.खंडणी विरोधी पथकाने आकाश शेट्टीला यापूर्वी अटक केली असून आता विल्यमला देखील बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकPoliceपोलिसArrestअटकExtortionखंडणी