Indore Crime: मध्य प्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी आणि क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदौरमधील एका २३ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. केवळ हत्याच नव्हे, तर हत्येनंतर मृतदेहावर अत्याचार करून आरोपी चक्क पनवेलच्या जंगलात जाऊन मृत तरुणीच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा अघोरी प्रयत्न करत होता. पीयूष धमनोतिया असे या नराधम आरोपीचे नाव असून, त्याच्या कबुलीजबाबाने पोलीसही हादरले आहेत.
हत्येचा कट आणि थरार
आरोपी पीयूष आणि मृत विद्यार्थिनी गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, लग्नावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद सुरू होता. १० फेब्रुवारी रोजी पीयूषने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्येचा कट रचला. तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त सांगून त्याने एका भाड्याच्या खोलीवर नेले. तिथे त्याने आधी तिला शारीरिक संबंधांसाठी सक्ती केली. तिने नकार दिल्यावर तिचे हात-पाय बांधले, डोळ्यावर पट्टी बांधली आणि गिफ्ट देतो असे सांगितले. त्यानंतर तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने तिच्या छातीवर इतक्या जोराने चाकू खुपसला की चाकूचे पातेच तुटले.
हत्येनंतर मृतदेहाशेजारी बसून प्यायला बिअर
पीयूषचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही. हत्येनंतर तो अडीच तास त्या खोलीतच होता. तो बाहेर गेला, तिथून बिअर घेऊन आला आणि मृतदेहाशेजारी बसून त्याने मद्यप्राशन केले. नशेत असताना त्याने मृत विद्यार्थिनीच्या मृतदेहावर पुन्हा शारीरिक अत्याचार केले. हे ऐकून जबाब नोंदवणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकांनाही अश्रू अनावर झाले.
व्हिडिओ व्हायरल करून बदनामी
हत्या केल्यानंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या बहिणीला मेसेज केला की, ती आता कधीच घरी परतणार नाही. इतकेच नाही तर, त्याने तरुणीसोबतचे ११ आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर आणि तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
पनवेलच्या जंगलात आत्मा बोलवण्याचे प्रयोग
गुन्हा केल्यानंतर पीयूष गोव्याला पळून गेला. तिथून महाराष्ट्रात येत असताना पोलिसांनी त्याला धावत्या ट्रेनमध्ये अटक केली. तपासात, अटकेपूर्वी तो मुंबईजवळील पनवेलच्या जंगलात लपला होता. तिथे तो मोबाईलवर यूट्यूबवर आत्मांशी संपर्क कसा साधायचा? हे व्हिडिओ पाहत होता. मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून तो तांत्रिक क्रिया करत तरुणीच्या आत्म्याला बोलावून तिची माफी मागत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
डॉक्टरांनाही बसला धक्का
तरुणीचे पोस्टमार्टम करणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुष डॉक्टरांच्या टीमला मृतदेहाची अवस्था पाहून धक्का बसला. सामान्यतः २-३ नमुने घेतले जातात, पण या केसमध्ये डॉक्टरांनी १२ विविध नमुने फॉरेन्सिक तपासासाठी जप्त केले आहेत. पीयूष सध्या ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेत आहेत.
Web Summary : An MBA student was brutally murdered by her boyfriend in Indore. He committed necrophilia and attempted occult rituals in Panvel forest to summon her spirit. The gruesome details shocked even the police.
Web Summary : इंदौर में एक एमबीए छात्रा की उसके प्रेमी ने बेरहमी से हत्या कर दी। उसने शव के साथ दुष्कर्म किया और पनवेल के जंगल में आत्मा को बुलाने का प्रयास किया। क्रूरता सुनकर पुलिस भी रो पड़ी।