शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Video : दिव्यांश सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा; वडिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 16:47 IST

पालिका प्रशासनासोबत पोलीस देखील जबाबदार आहेत.

ठळक मुद्देआम्हाला मदत करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात डांबत आहेत. श्रवण तिवारी या सामाजिक कार्यकर्त्याची कॉलर पकडून पोलिसांनी नेले. दिव्यांश न सापडल्याने आज गोरेगाव पूर्वमधील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई - गोरेगाव येथील आंबेडकर नगर परिसरातील गटाराच्या नाल्यात दिव्यांश पडला. या घटनेला ३६ तास उलटले आहेत. तरीही माझा मुलगा सापडलेला नाही. शोधपथक वरवरची शोधमोहीम राबवत आहे. पालिका प्रशासनासोबत पोलीस देखील जबाबदार आहेत. कारण आम्हाला मदत करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात डांबत आहेत. आम्ही प्रेमनगर येथील नाल्याजवळ शोधकार्य सुरु असताना गेलो असता येथून परताना माझ्यासोबत असलेल्या श्रवण तिवारी या सामाजिक कार्यकर्त्याची कॉलर पकडून पोलिसांनी नेले. याचा अर्थ आम्हाला मदत करणाऱ्या लोकांना पोलीस पकडून नेऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सूरज सिंग यांनी केली आहे.  

दिव्यांश न सापडल्याने आज गोरेगाव पूर्वमधील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही खबरदारी घेत दिंडोशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सामाजिक कार्यकर्ता श्रवण तिवारी यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले आहे. दिव्यांश ज्या ठिकाणी नाल्यात पडला होता. त्याच्या आसपासच गटारे, नाले आणि ड्रेनेज लाईनमध्ये  आता शोध मोहीम राबवण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरagitationआंदोलन