शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक खाते 'हॅक' करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडे करणार तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 23:49 IST

Murlidhar Mohol : महापौरांच्या जागरूकतेमुळे 'नायजेरियन फ्रॉड'ची ही बाब उजेडात आली. पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली. 

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक अकाऊंट बनावट ईमेलद्वारे 'हॅक' करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. महापौरांच्या जागरूकतेमुळे 'नायजेरियन फ्रॉड'ची ही बाब उजेडात आली. पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली. 

महापौर मोहोळ यांच्या महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल आला असून 'आपणास परदेशातील कंत्राटदार म्हणून देय असलेली रक्कम मिळाली की नाही याची खातरजमा करण्यासाठी हा ई मेल पाठवीत आहोत. ही रक्कम मिळाली नसल्यास या मेलला उत्तर द्या. 'फंड टू एटीएम' या रोख हस्तांतरणासाठी आपले पूर्ण नाव,  संपर्क क्रमांक, पासपोर्ट किंवा ड्रायव्हरचा परवाना, मोबाईवल क्रमांक पाठवावा असे या ई मेल मध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या ईमेलमध्ये फेडरल सरकार आणि सेंट्रल बँकेच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. 

महापौरांच्या नावाचा पालिकेचा अधिकृत ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडीवर नायजेरियन फ्रॉड द्वारे २ नोव्हेंबर रोजी ई-मेल पाठविण्यात आला. मेहमूद बुरानी नावाच्या व्यक्तीच्या नावे हा मेल आला असून 'एफजीएन एटीएम'चा प्रवक्ता असल्याचे या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. सुदैवाने हा प्रकार नायजेरियन फ्रॉडचा असल्याचे महापौरांच्या लक्षात आले. त्यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या ई-मेलला कोणताही प्रतिसाद न देण्याच्या सूचना दिल्या. महापौरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. जिथे महापौरांचे खाते हॅक करण्याचा प्रयत्न होतो आहे तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. --------कंत्राटदार म्हणून देय रक्कम पाठविणे आणि एटीएमसंदर्भात माझ्या पालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल आला. हा प्रकार नायजेरियन फ्रॉडचा असून खाते हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून तपासाची मागणी केली आहे. नागरिकांनीही ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्यावी.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे