चोरीला गेलेल्या बाळाचा लवकर शोध घेण्यासाठी महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 15:43 IST2021-12-01T15:42:43+5:302021-12-01T15:43:13+5:30
Mayor Meet to DCP Regarding child Robbery : महापौरांनी यांनी बाळाच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी देखील लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले.

चोरीला गेलेल्या बाळाचा लवकर शोध घेण्यासाठी महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट
मुंबई - काल घोडपदेव येथे 3 महिन्याच्या बाळाच्या चोरीची घटना घडली. या घटनेमुळे विभागात चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात नेमकी काय घटना घडली तसेच तपास यंत्रणा कशा रीतीने तपास करीत आहेत. यासाठी मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणेकर व स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पोलीस उपायुक्त विजय पाटील यांची काळाचौकी पोलीस ठाण्यात भेट घेतली.
यावेळी महापौरांनी यांनी बाळाच्या आई वडिलांना भेटून त्यांना धीर दिला पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी देखील लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक रमाकांत रहाटे, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, काळाचौकी पोलीस ठाण्याच्या एसीपी संगीता पाटील आदी उपस्थित होते.
आईला गुंगीचे औषध देत दिवसाढवळ्या राहत्या घरातून बाळाची चोरी
जुन्या मोबाईलवर बास्केट देण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या घरात शिरलेल्या महिलेने आईला गुंगीचे औषध देत ३ महिन्याच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घोडपदेव परिसरात घडला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.