गाझियाबादच्या कौशांबी पोलिसांनी मथुरा येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मीरा ठाकूर उर्फ हरिया हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. मथुरेतील रिफायनरी ते टँक रस्त्यापर्यंत ई-रिक्षा चालवणाऱ्या मीराच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मथुरेतील अत्यंत संवेदनशील भागांचे अनेक फोटो सापडले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, मीराच्या हालचाली बऱ्याच काळापासून संशयास्पद होत्या. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून, हेरगिरीचं नेटवर्क आणि तिच्या थेट संबंधांची पूर्णपणे पुष्टी करण्याचं काम सुरू आहे.
मीरा ठाकूरचा भाऊ नरोत्तम याने दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबतच्या वादामुळे पोलीस तिला घेऊन गेले असावेत असं कुटुंबाला वाटलं होतं. मीराचं लग्न २०१२ मध्ये आग्रा येथील मुकेशसोबत झालं होतं, त्यानंतर ते मथुरेत राहू लागले. मीरा सुरुवातीला मेकॅनिक म्हणून काम करायची, पण 'मोठं होण्याच्या' इच्छेने तिला चुकीच्या मार्गावर ढकललं.
२०२५ मध्ये दिल्ली पोलिसांनी तिला शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलं होतं. जेलमधून सुटल्यानंतर तिने ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, मीरा फेसबुकच्या माध्यमातून नौशाद आणि सोहेल सारख्या संशयास्पद व्यक्तींच्या ग्रुपशी जोडली गेली होती.
चौकशीदरम्यान मीराने एसआयटीला सांगितलं की, तिची नौशादशी फेसबुकवर ओळख झाली होती, त्यानंतर ती सोहेल आणि नौशादच्या ग्रुपमध्ये सामील झाली. या ग्रुप्सच्या माध्यमातून तिने कोणती संवेदनशील माहिती शेअर केली आहे, याचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत. मीराचा मोबाईल डेटा आणि तिच्या अलीकडील हालचालींची तपासणी केली जात आहे.
Web Summary : Meera Thakur, an e-rickshaw driver, was arrested for espionage in Mathura. Police found sensitive photos on her phone. She had suspected links to anti-national activities and was previously jailed for arms smuggling. Investigation ongoing regarding her network and information sharing.
Web Summary : ई-रिक्शा चालक मीरा ठाकुर को मथुरा में जासूसी के आरोप में गिरफ्तार किया गया। पुलिस को उसके फोन में संवेदनशील तस्वीरें मिलीं। उस पर देशविरोधी गतिविधियों में शामिल होने का संदेह है और पहले हथियार तस्करी के आरोप में जेल जा चुकी है। उसके नेटवर्क और सूचना साझा करने की जांच जारी है।