शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:15 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी केली आहे.

मेघालयातील इंदूर येथील राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशीने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी केली आहे. लग्नापूर्वी सोनमचे राज कुशवाहशी प्रेमसंबंध होते आणि तोच या हत्येचा मास्टरमाईंड आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

राजाच्या हत्या प्रकरणाच्या तपासात असं दिसून आलं की, सोनमच्या वडिलांचा इंदूरमध्ये एक छोटा प्लायवूड कारखाना आहे, जिथे राज कुशवाह काम करत होता. सोनम अनेकदा कारखान्याच्या कार्यालयात येत असे आणि इथेच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. तिथेच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. राज कुशवाह हा सोनमपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. या प्रेमप्रकरणामुळेच सोनमने राजसोबत मिळून राजाच्या हत्येचा भयंकर कट रचला.

"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?

इंदूरचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचं ११ मे रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या नऊ दिवसांनंतर २० मे रोजी हे कपल मेघालयला त्यांच्या हनिमूनसाठी निघाले. २२ मे रोजी ते भाड्याने घेतलेल्या स्कूटरने मावलाखियाट गावात पोहोचले. नोंगरियाटमधील शिप्रा होमस्टे येथे एक रात्र राहिले आणि २३ मे रोजी सकाळी बाहेर पडले. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. 

"सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

२४ मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावर सोहरारीम येथील एका कॅफेबाहेर त्यांची स्कूटर सापडली. त्यानंतर राजाचा मृतदेह वेइसावडोंग धबधब्याजवळील खोल दरीत आढळला. पोलीस आता हत्येच्या कटाचा आणि इतर लोकांचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी आनंद याला अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक