फुटबॉलच्या मैदानावर भीषण नरसंहार; दहशतवाद्यांकडून 50 लोकांची निर्घृण हत्या

By हेमंत बावकर | Published: November 11, 2020 02:57 PM2020-11-11T14:57:32+5:302020-11-11T14:58:07+5:30

ISIS terrorists : दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावल्या.

massacre on the football field; 50 people brutally killed by terrorists ISIS | फुटबॉलच्या मैदानावर भीषण नरसंहार; दहशतवाद्यांकडून 50 लोकांची निर्घृण हत्या

फुटबॉलच्या मैदानावर भीषण नरसंहार; दहशतवाद्यांकडून 50 लोकांची निर्घृण हत्या

Next

आफ्रिकी देश मोझांबिकमध्ये मोठा नरसंहार झाला आहे. काबो डेलडागो प्रांतामध्ये इसिसच्यादहशतवाद्यांनी एका फुटबॉल मैदानात 50 हून अधिक लोकांची मुंडकी उडविली आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करण्यात आले. या हत्याकांडामध्ये 15 मुलांचाही समावेश आहे. 


या लोकांच्या मृतदेहांचे तुकडे गावाच्या आजुबाजुच्या जंगलात तसेट फुटबॉल मैदानात सापडले आहेत. मोझांबिकच्या सरकारी मीडियानुसार दहशतवाद्यांनी सोमवारी अनेक गावांवर हल्ला केला. यानंतर तेथील लोकांना फुटबॉलच्या मैदानावर घेऊन गेले. येथे त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली. 


दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावल्या. काबोच्या डेलडागो प्रांतामध्ये आयएसआयएसचे दहशतवादी 2017 पासूनच असे हल्ले करत आले आहेत. तेव्हा 200 हून जास्त लोकांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 2000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर चार लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. 

गेल्या मार्चमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबुल ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्याने हादरली होती. मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुद्वारावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी पुन्हा शीखांच्या निवासी कॅम्पजवळ बॉम्बहल्ला करण्यात आला होता. या प्रकारावर भारतीय दूतावासाने नाराजी व्यक्त केली आहे.


हा हल्ला या देशांतील अल्पसंख्यांकांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता. तसेच दु:ख व्यक्त केले होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निषेध व्यक्त करताना कोरोना व्हायरस पसरलेला असताना अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. यामुळे हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड होत आहे, असे म्हटले होते. 


भारत लक्ष्यावर
दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, केरळ आणि कर्नाटकात ISIS च्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत  हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.

Web Title: massacre on the football field; 50 people brutally killed by terrorists ISIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.