शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:03 IST

लग्न झाल्यापासून सासरचे मंडळी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करत..

पिंपरी : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार छळ केला. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर भागुजी हवाले (वय ५५, रा़ उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती संदीप विष्णू हसनाळे (वय ३७, रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सासू शशीकला विष्णू हसनाळे (वय ६५), शेखर डहाके (वय ३२) भामाबाई एकनाथ केळगंद्रे (वय ६५) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मीना हिचे २००७ मध्ये संदीप हसनाळे याच्यासोबत लग्न झाले. लग्न झाल्यापासून सासरचे मंडळी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करत. तसेच विनाकारण भांडणे करून मीनाचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला कंटाळून मीना यांनी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस