शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मंचर येथे गर्भपातास नकार दिल्याने नवविवाहितेचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:57 IST

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देआरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल नवविवाहितेला फाशी दिल्याचे वैदकीय अहवालात नमूद

निरगुडसर : माहेरहून पैसे व दागिने आणत नाही,तसेच गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचरपोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पूनम स्वप्नील ढमाले (वय २५) असे झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती स्वप्निल भरत ढमाले, सासु संगीता भरत ढमाले, सासरे भरत ढमाले, दिर निखिल भरत ढमाले, सुमित भरत ढमाले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पूनम हि विज्ञान शाखेची पदवीधर तर पती स्वप्नील हा बारावी शिकलेला आहे. त्याची पेठ येथे चायनीजची गाडी आहे. दोघांमध्ये प्रेम प्रकरण होते. तिच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. सात महिन्यापूर्वी दोघांनी तिच्या आईवडिलांचा विरोध असतानाही विवाह केला. त्यानंतर एक महिन्याने तिच्या आईवडिलांची सहमती मिळाल्यानंतर आळंदी येथे सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. तिला वारंवार मारहान करून माहेरून पैसे व दागिने घेवून ये असा तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. ती तीन महिन्याची गर्भवती होती. तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्याच्या पुर्वी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वडील शाम भिमाजी सैद (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांना  घटना समजताच ते मंचर पोलीस ठाण्यात आले. ‘‘माझी मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. सासरच्या लोकांनी पुनमचा गळा दोरीने आवळून तिला ठार केले आहे.’’ अशी फिर्याद  नोंदविली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. तिला फाशी दिल्याचे वैदकीय अहवालात नमूद केले आहे. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तिच्यावर माहेरी महाळुंगे पडवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ करत आहेत.

टॅग्स :MancharमंचरPoliceपोलिसWomenमहिलाMurderखून