शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अल्पवयीन मुलाशी लग्न करणं पडलं महागात; तिला झाली अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:57 IST

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 11 महिन्यांनंतर या तरुणीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, या तरुणीने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी या मुलाशी गपचूप लग्न केलं होतं. 

ठळक मुद्देलग्नानंतर अटक महिला आई बनली असून पाच महिन्यांची एक मुलगी आहे. तिने आपलं या 17 वर्षीय मुलाशी लग्न झाल्याचा दावा केला. ही महिला वारंवार आपल्या मुलाला आत्महत्या करण्याची धमकी देत होती

मुंबई - एका तरुणीने 17 वर्षांच्या मुलाशी लग्न केल्याने तरुणीला अटक झाल्याची अजब घटना घडली आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध पोक्सोअंतर्गत तक्रार दाखल करून तिच्याविरुद्ध कारवाई केली आहे. लग्नानंतरअटक महिला आई बनली असून पाच महिन्यांची एक मुलगी आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 11 महिन्यांनंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी या मुलाशी गपचूप लग्न केलं होतं.  23 नोव्हेंबर 2017 रोजी ही महिला मुलाच्या घरी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचे आईवडील आणि भाऊही होता. तिने आपलं या 17 वर्षीय मुलाशी लग्न झाल्याचा दावा केला. मुलाच्या आईवडिलांनी महिलेला विरोध केल्यानंतर महिलेने त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं आणि जर मुलगा आपल्यासोबत आला नाही तर आत्महत्या करण्याची धमकीही दिली. त्यानंतर मुलगा महिलेच्या घरी जाऊन तिथे राहायला लागला. या महिलेची आणि मुलाची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून या मुलाचं वागणं बदललं होतं. या महिलेच्या संगतीने आपला मुलगा दहावीत नापास झाला आहे. आरोपी महिलेचे यापूर्वी दोन घटस्फोट झाले आहेत. ही महिला वारंवार आपल्या मुलाला आत्महत्या करण्याची धमकी देत होती आणि दोन वेळा तसा प्रयत्नही तिने केला होता असं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच आरोपी महिलेने मुलगा म्हणजेच तिचा पती अल्पवयीन नसल्याचे प्रत्यारोप केला आहे. मुलाला एक भाऊ व बहीण आहेत. लग्नाच्यावेळी जर मुलाचं वय 17 वर्ष 8 महिने होतं तर त्याच्या मोठ्या बहिणीचं वय 18 वर्ष कसं असू शकतं, असा सवाल आरोपी महिलेने उपस्थित केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकmarriageलग्नPOCSO Actपॉक्सो कायदा