गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:32 IST2025-08-25T12:30:22+5:302025-08-25T12:32:01+5:30
Romance and Crime News : न्यायालयाने कशाच्या आधारावर दिला निर्णय? वाचा सविस्तर

गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
Romance and Crime News: सध्या सर्वत्र एका विचित्र घटनेची चर्चा सुरू आहे. एक विवाहित पुरूष आपल्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हॉटेल रूमवर या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित होत असताना पुरुषाचा मृत्यू झाला. हे प्रकरण पुढे जेव्हा न्यायालयात पोहोचले, तेव्हा न्यायालयाने गर्लफ्रेंडला मृत पुरुषाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
चीनच्या गुआंग्शी झुआंग या परिसरातील पिंगनान काउंटी येथे १४ जुलैला पुरुषाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच वय ६६ वर्षे होते आणि त्याचे नाव झोउ (Zhou) असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, झोउ यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि त्यांना आधी स्ट्रोकही येऊन गेला होता. मृत्यूच्या काही तास आधी झोउ आपली गर्लफ्रेंड झुआंग (Zhuang) हिच्यासोबत हॉटेलच्या रूमवर गेले. त्या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि नंतर दोघेही झोपी गेले. गर्लफ्रेंड झोपेतून उठवल्यानंतर तिने झोउ यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठले नाहीत. त्यांचा श्वासही बंद पडला होता.
घाबरलेली गर्लफ्रेंड झोउ यांना रुग्णालयात न नेता हॉटेलमधून घरी गेली.तिलादेखील रक्तदाबाचा त्रास होता, त्यामुळे ती औषध घ्यायला हॉटेल रूममधून बाहेर गेली. तासभराने ती पुन्हा हॉटेलमध्ये आली आणि हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडून आत गेली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. डॉक्टर आणि पोलिसांच्या तपासातून झोउचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
झोउ यांची पत्नी आणि मुलगा यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कळल्यानंतर न्यायालयात धाव घेतली. त्यांनी याचिकेत गर्लफ्रेंड झुआंग आणि हॉटेल प्रशासन यांच्याकडून ५.५ लाख युआन म्हणजे सुमारे ६६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली. यात झोउचे उपचार आणि अंत्यसंस्कार याचा खर्च समाविष्ट होता.
न्यायालयाने निकाला दिला की, झोउ यांचा मृत्यू जुन्या आजारामुळे झाला. पण तरीही न्यायालयाने गर्लफ्रेंड झुआंगला निर्दोष मानण्यास नकार दिला. संकटकाळात मदत मागण्याऐवजी हॉटेल रूममधून पळून जाणे हा बेजबाबदारपणा आहे. जर तेव्हा मदत मिळाली असती आणि झोउ यांच्यावर उपचार झाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. झोउ यांच्या मृत्यूसाठी त्यांचे आजारपण ९० टक्के जबाबदार असले तरीही १० टक्के गर्लफ्रेंडचा बेजबाबदारपणाही आहे. याच आधारावर न्यायालयाने गर्लफ्रेंडला आदेश दिला की, मृत झोउ यांच्या कुटुंबाला तिने ६२ हजार युआन म्हणजे सुमारे ८.६ लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी.
न्यायालयाने हॉटेल प्रशासनला निर्दोष मानले. कारण एखाद्या बंद खोलीच्या आत कुठलाही स्टाफ हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.