शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खळबळजनक! लग्नापूर्वी दोन कुटुंबात झाली, हाणामारीत एकाच मृत्यू तर 5 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:10 IST

Assaulting : आठ फरार, आराेपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी    

ठळक मुद्देपोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला.

निखील म्हात्रे

अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथे झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (11 ऑक्टोबर) रोजी घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी आठ जणांचा शोध सुरु  आहे. लग्नापूर्वीच दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला.आज या अटकेतील पाच जणांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

पेझारी येथील एका मुलीचे लग्न बदलापूर येथील मुलासोबत ठरले होते. या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्र मात मुलीकडील फोटोग्राफरने मुलाच्या लहान बिहणीचा नंबर मागितला. तसेच ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब मुलाच्या घरच्यांना आवडली नाही. यावरु न दोन कुटुंबात वाद सुरु  झाले. मुलाच्या घरच्यांनी त्या फोटोग्राफरला माफी मागायला सांगा, असे मुलीकडच्या मंडळींना सांगितले. तसेच माफी मागितली नाही तर लग्न करणार नाही, असेही कळवले. मात्र याकरिता मुलीच्या घरचे तयार नव्हते. या विषयावरु न रविवारी पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही कुटुंबांनी बैठक बोलावली.  वाद चिघळत जाऊ  नये म्हणून प्रत्यक्ष भेटून विषय संपवून टाकू, असे सांगितले. त्यानुसार नवरा मुलगा, त्याचे तीन भाऊ आणि गाडी चालक असे पाच जण रविवारी पेझारीला आले. पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये बोलणी सुरु  झाली. आवाज वाढू लागले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर जोरदार बाचाबाची सुरु  झाली. ते पाच आणि हे दहा ते बारा जण. त्यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यास सुरु वात केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळीपोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला. पोलिसांनी त्यांना मेडीकल करण्यास सांगितले. त्यानुसार तुपट आणि अन्य पोयनाड येथील आरोग्य केंद्रात गेले. मात्र त्यांच्याकडे पोलिसांचे पत्र नसल्याने त्यांना दाखल करु न घेतले नाही. त्यामुळे अलिबाग जिल्हा रु ग्णालयात दाखल होण्यास सांगितले. रु ग्णालयात उपचार सुरुअसतानाच विठू तुपट याचा मृत्यू झाला. विठू याच्यामागे दोन लहान मुली आहेत. एका किरकोळ वादातून एक जीव तर गेलाच; परंतु दोन लहानग्यांचे वडील ही गमावले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी हत्येसह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार असलेल्या आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनीदिली. अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Policeपोलिसalibaugअलिबागmarriageलग्नDeathमृत्यू