शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

थोरलीशी विवाह; धाकटीवर जडला जीव! लग्नासाठी मेहुणी, सासूवर केला कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:24 IST

Stabbing Case : याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

खामगाव (बुलढाणा) : थोरलीशी विवाह केल्यानंतर पत्नीच्या धाकट्या बहिणींवर जावयाचा जीव जडला. त्यामुळे त्याने तिच्याशीही विवाह करण्यासाठी सासू आणि मेहुणीवर दबाव वाढविला. दोघींनीही लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासू आणि मेहुणीवर कोयत्याने वार केले. ही घटना खामगाव शहरानजीक असलेल्या एका गावात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील वृद्ध महिलेच्या थोरल्या मुलीचा जळगाव खानदेश जिल्ह्यातील एका गावातील असलेल्या आरोपीशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर जावयाचा पत्नीच्या धाकट्या बहिणीवर जीव जडला. त्यामुळे त्याने नात्याचा कोणताही विचार न करता, धाकटीशी विवाह लावून देण्यासाठी वृद्ध सासूवर दबाव आणला. तसेच मेहुणीला सोबत येण्यासाठी धमकी दिली. सासूने लग्नास नकार दिल्याने जावई आणि सासूमध्ये वाद झाला. चिडून जावयाने सासूवर कोयत्याने वार केले. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या मेहुणीवरही त्याने वार केले. याप्रकरणी तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाPoliceपोलिसmarriageलग्न