शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 21:36 IST

आज हळद, सोमवारी होते लग्न : भिलोना गावात शोककळा

परतवाडा (अमरावती)  : अचलपूर तालुक्यातील भिलोना येथील २९ वर्षीय युवकाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयाघाताने मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. सागर अण्णा साबळे असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.  

या युवकाचा सोमवारी अमरावती येथे विवाह होणार होता. रविवारला त्याला हळद लागणार होती. ठाणे येथे एसटी महामंडळात तो चालकपदावर कार्यरत होता. मागील वर्षीच त्याला ही नोकरी लागली. त्याला आई-वडील नाहीत. घरात तो एकटाच होता. आपल्या विवाहित बहिणीच्या मदतीने तो स्वत:च्या लग्नाची तयारी करीत होता. धावत होता. त्याने अमरावतीला जाऊन खरेदीही केली. लॉकडाऊनपासून तो गावातच मुक्कामी असून बाहेरगावाहून आल्यामुळे त्याने त्यादरम्यान स्वत:ला चौदा दिवस होमक्वारंटाईन करून घेतले होते.

काही दिवसांपूर्वीच त्याचे साक्षगंधही झाले होते. शुक्रवारी सकाळी त्याच्या छातीत दुखायला लागले म्हणून मित्रांसमवेत तो परतवाड्यात डॉक्टरकडे आला. दरम्यान त्याचे छातीचे दुखणे थांबले. डॉक्टरांनी अ‍ॅडमिट करून घेतले, तर आपले लग्न राहून जाईल म्हणून तो आपल्या मित्रांसमवेत परत गावात आला. पण, शनिवारी सकाळी त्याच्या छातीत परत दुखायला लागले. मित्रांनी वाहनात टाकून परतवाड्यात आणले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मित्रांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात नेला. तेथे त्याचे शवविच्छेदन केल्या गेले. शनिवारला सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान भिलोना येथील चंद्रभागा नदीच्या तिरी त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने सर्व गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाmarriageलग्नAmravatiअमरावतीDeathमृत्यू