बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा हेतू काय होता, हे अद्याप कळू शकलेलं नाही. हल्लेखोर फक्त चोरी करण्यासाठी घरात घुसला होता की, सैफ अली खानवर हल्ला करणं त्याचं लक्ष्य होतं; याचा तपास पोलीस करत आहे. पण, आरोपीचा दुसरा व्हिडीओ समोर आल्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हल्लेखोर अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. पण, जो दुसरा व्हिडीओ समोर आला आहे, त्यात हल्लेखोर वर जाताना दिसत आहे. वर जाताना हल्लेखोराने पायात काहीही घातलेलं नाही.
तीन गोष्टी आणि पोलिसांसमोर प्रश्न
सीसीटीव्ही व्हिडीओतून तीन गोष्टी दिसून आल्या आहेत. पहिली म्हणजे हल्लेखोर वर जाताना अनवाणी पायाने गेला, पण परत येतान त्याच्या पायात बूट होता. दुसरी गोष्ट म्हणजे वर जात असताना त्याची बॅग भरलेली होती, पण परत येताना ती रिकामी दिसत आहे.
तिसरी गोष्ट जी पोलिसांना व्हिडीओत दिसून आली, सैफ अली खानच्या घरात जाण्यापूर्वी त्याने चेहरा झाकलेला होता. पण, हल्ल्यानंतर पळून जाताना त्याने चेहरा झाकलेला नव्हता. सीसीटीव्ही लावलेले आहेत, हे माहिती असूनही त्याने चेहरा उघडा का ठेवला? असा प्रश्नही पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
सैफ अली खानच्या पाठीत निघाला अडीच इंच चाकू
हल्लेखोराने सैफ अली खानवर हल्ला चढवला. चाकूने वार केला. यात चाकू सैफ अली खानच्या पाठीत घुसला. झटापटीत चाकू मोडला आणि अडीच चाकू पाठीतच राहिला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा चाकू काढला.