शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 21:25 IST

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत.

Lawrence Bishnoi Gang: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकीचे पत्र या दोन्ही प्रकरणांचे दुवे लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी जोडले जात आहेत. एकीकडे मुंबई पोलीस, गुन्हे शाखा, महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेलची टीम सलमान खानला दिलेल्या धमकीच्या प्रकरणावर तपास करत आहे, तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी नुकतीच सौरभ महाकाल उर्फ ​​सिद्धेश कांबळे (20) याला अटक केली आहे.गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ही टोळी या सेलिब्रिटींकडून वसुली करण्याचा डाव आखत होती. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर आली असून तपास यंत्रणा आता त्यांच्याकडून अधिक माहिती काढत आहेत.सौरभ महाकाल याच्यासोबत आणखी २ जण काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. पुणे पोलिसांच्याही रडारवर १० हून अधिक लोक आहेत, जे बिश्नोई टोळीसाठी काम करत होते. ही गॅंग पुण्याच्या आसपास आपली एक टीम बनवत होती. आता महाकालच्या टीममधील कोण कोण होते, याचा तपास एजन्सी करत आहेत.

सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?बिश्नोई टोळीने सलमानला धमकीचे पत्र पाठवले होतेअलीकडे, पोलिसांनी सांगितले होते की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या तीन गुंडांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवले होते आणि ते गुंड विक्रम बरारच्या कटाचा एक भाग होते, ज्याचा उद्देश पिता-पुत्रांना धमकावून खंडणी उकळण्याचा होता. विक्रम बरार हा कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर गोल्डी बरारचा भाऊ आहे. गोल्डी हा बिश्नोई टोळीचा भाग असून त्याने मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक आले आहे. सध्या फरार असलेला टोळीचा सदस्य संतोष जाधव याच्या ठावठिकाणाबाबत काही सुगावा मिळणे हा चौकशीचा उद्देश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSalman Khanसलमान खानbollywoodबॉलिवूडArrestअटकMumbaiमुंबईPuneपुणेdelhiदिल्ली