शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ? शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 06:37 IST

Sachin Vaze : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता.

मुंबई : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. त्याच्या ऑडी कारमधून एकत्र प्रवास करीत त्यांनी त्याबाबतचा प्लॅन केला होता, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली. वाझे व शिंदे ऑडीतून प्रवास करीत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज वरळी सी-लिंकच्या टोल नाक्यावर सापडले आहेत. ही ऑडी वसई, विरार या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे, त्यामुळे तपास पथकाने गुरुवारी त्या भागात जाऊन शोधमोहीम राबविली.वाझेकडे विविध कारचा ताफा होता. त्यापैकी अनेक इतरांच्या नावावर असून तो त्याचा वापर सोयीनुसार करत होता. एनआयएने मर्सिडीज, इनोव्हा, स्काॅर्पिओ, आउट लँडर अशा एकूण सात गाड्या जप्त केल्या आहेत. त्याशिवाय निळ्या रंगाची ऑडीही त्याच्याकडे होती. बहुतांशवेळा  ती ‘सीआययू’मधील त्याचा तत्कालीन सहकारी  सहाय्यक निरीक्षक प्रशांत ओव्हाळ आणि अटकेत असलेला विनायक शिंदे यांच्याकडे असायची, अशी माहिती समोर आली आहे.वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावरील २ मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही ऑडी (एमएच ०४ एफझेड ६५६१) आढळून आली आहे. शिंदे ती चालवित होता, तर वाझे बाजूला बसला होता. टोल देण्यावरून शिंदेचा कर्मचाऱ्यांशी वाद   झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. यावेळी दोघांनी हिरेन यांच्या  हत्येचा कट रचल्याची शक्यता अधिकाऱ्यांना आहे. शिंदेने ही गाडी वसई-विरार भागात नेऊन ठेवल्याची माहिती मिळाल्याने तेथे शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा