शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:18 IST

Mansukh Hiren Murder: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते

ठळक मुद्देकट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहेतपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते.

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.(Sachin Vaze present at meeting where Mansukh Hiren's murder was planned: NIA tells court)

मंगळवारी NIA ने कोर्टात म्हटलं की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

ठाण्यातील मनसुख हिरेन यांची स्कोर्पिओ गाडी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती(Mukesh Ambani Bomb Scare), या गाडीत स्फोटकांनी भरलेल्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. यात महाराष्ट्र एटीएसनं निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अलीकडेच अटक केली होती.

एनआयएच्या माहितीप्रमाणे, तपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते. यातील एका मोबाईल नंबरवरून सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी वापरत होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा होण्यापर्यंत NIA चा तपास पोहचला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस(Maharashtra ATS) करत होती, परंतु त्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला. NIA मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्हीचा तपास करत आहे, NIA ने कोर्टात हे दोन्ही प्रकरण एकमेकांनी जोडले आहेत असं सांगितलं आहे. सचिन वाझेला ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.    

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीAnti Terrorist Squadएटीएस