मनमाडच्या बेपत्ता ९ वर्षीय मुलाची निर्घुण हत्या; मृतदेहाशेजारी आढळली करवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:33 IST2022-12-01T18:32:14+5:302022-12-01T18:33:02+5:30
लोकेश काल भाड्याची सायकल खेळत असतांना गायब झाला होता.रात्री उशिरा शहर पोलिसांत तो हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

मनमाडच्या बेपत्ता ९ वर्षीय मुलाची निर्घुण हत्या; मृतदेहाशेजारी आढळली करवत
अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : घरातून कालपासून बेपत्ता असलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह मनमाडच्या फिल्टर हाऊस जवळील पुणे - मनमाड लोहमार्गाशेजारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.लोकेश सोनवणे असे मृत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेहाचा उजवा हात व करंगळी कापलेली व चेहऱ्यांवर ओरखडे आढळून आहे.मृतदेहासाठी करवतही आढळून आल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.
लोकेश काल भाड्याची सायकल खेळत असतांना गायब झाला होता.रात्री उशिरा शहर पोलिसांत तो हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. आज अचानक त्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला.अद्यापही हत्येमागे नेमके काय कारण हे अस्पष्ट असून,त्याची सायकलही गायब आहे. शहर व लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.