शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्यात मुलाचा आढळला मृतदेह, आई बेशुद्धावस्थेत; सहकारनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 09:03 IST

सहकारनगर भाग दोनमधील शिरीष सोसायटीमधील एका बंगल्यात हा प्रकार घडला आहे.

पुणे : सहकारनगर येथील एका बंगल्यात मुलाचा मृतदेह मिळाला असून त्याची आई गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. किमान तीन दिवसांपासून हे दोघेही घरातच पडून असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सहकारनगर भाग दोनमधील शिरीष सोसायटीमधील एका बंगल्यात हा प्रकार घडला आहे. आशिर्वाद सदावर्ते (वय ४२) असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांची ९० वर्षांची आई बेशुद्धावस्थेत सापडली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर भाग दोनमधील एका बंगल्यातून वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बहिणीला कळविली. त्यांनी पुण्यात राहणाऱ्या बहिणीला याची माहिती दिली़ त्यांनी घरी जाऊन पाहिले तर दरवाजा आतून बंद होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आत पाहिल्यावर मुलगा चा मृतदेह पलंगावर आढळून आला. तर त्यांची आई बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोन ते तीन दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. आशिर्वाद सदावर्ते याच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही. डॉक्टरांनी व्हिसारा राखून ठेवला आहे.

घरात दोघे मायलेक राहत होते. आशिर्वाद यांचा विवाह झाला नव्हता. त्यांना दारुचे व्यसन होते. आशिर्वाद सदावर्ते यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा़ त्यांच्या मृतदेहाचे विघटन होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत होते. त्यांच्या आईवर उपचार सुरू असून त्या अजून माहिती देण्याच्या मनस्थितीत नाही असे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस