ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करतांना एकाला जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:29 IST2021-01-14T11:29:21+5:302021-01-14T11:29:31+5:30

मध्यरात्री चार ते पाच अनोळखी इसम गावातील एका वार्डात घरोघरी जाऊन पैसे वाटप करत होते.

A man was beaten by a mob while distributing money on the backdrop of Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करतांना एकाला जमावाची मारहाण

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करतांना एकाला जमावाची मारहाण

जळगाव: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करतांना एका कार्यकर्त्याला नागरिकांनी पकडले आणि मारहाण करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना नेरी ता.जामनेर येथे गुरुवारी सकाळी  घडली. यावेळी शेकडो नागरिकांनी एकच गर्दी करत प्रचंड संताप व्यक्त केला.

बुधवारी १३ रोजी मध्यरात्री चार ते पाच अनोळखी इसम गावातील एका वार्डात घरोघरी जाऊन पैसे वाटप करत होते. काही जणांनी  त्यांना हटकले. मात्र गुरुवारी सकाळी यातील एक जण गावात दिसल्याने त्याला पकडून मारहाण करण्यात आली. त्याचे नाव समजू शकले नाही.

Web Title: A man was beaten by a mob while distributing money on the backdrop of Gram Panchayat elections