शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लसूण चोरी केल्याच्या आरोपावरून एकाला नग्न करून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:09 IST

चक्क चोरांनी आपला मोर्चा लसूण आणि कांद्याकडे वळवला आहे.

मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात असलेल्या भाजी मार्केटमध्ये एकाला लसूण चोरी केल्याच्या आरोपावरून नग्न करून मारहाण केल्याची घडना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या मारहाणीच्या व्हिडिओत जे गुन्हेगार दिसत आहेत, त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी एस. एल बौसारी यांनी सांगितले. 

दरम्यान, सोन्याचे दागदागिने, रोकड रक्कम चोरीच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. पण आता चक्क चोरांनी आपला मोर्चा लसूण आणि कांद्याकडे वळवला आहे. लसूण आणि कांद्याचे दर वाढल्यानंतर देशातील अनेक भागातून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील आलमबागच्या मवैया भाजी मार्केटमध्ये एका दुकानातून जवळपास 160 किलो लसूण आणि 70 किलो कांद्याची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुकानदाराने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

याचप्रकारे पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे एका दुकान चोरी झाल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेत चोरट्यांनी दुकानातील 50 हजार रुपयांची लसूण, आल्लं आणि कांद्याची चोरी करुन पळ काढला. पण, दुकानातील रक्कम तशीच होती, तिला हात लावला नव्हता. याशिवाय, गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शेतमालक झोपेत असताना शेतात असलेल्या कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला लक्ष्य करीत तीस गोण्या कांद्याची चोरी करण्याच्या प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, आवाजाने शेतकरी जागा झाल्यामुळे कांदे चोरीचा प्रयत्न फसला व चोरट्यांनी कांद्याच्या गोण्या फेकून देत तेथून पळ काढला होता. 

(देश कांद्याच्या दरानं हैराण अन् अर्थमंत्री म्हणतात; मी फार कांदा, लसूण खात नाही)(सुकलेला लसूण टाकून देताय?; असं करू नका, फायदे वाचून व्हाल हैराण)(प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवतात...)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशThiefचोर