अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 07:09 PM2021-11-30T19:09:05+5:302021-11-30T19:13:04+5:30

Crime News : विपुल तेलगाेटे याने तीला विविध ठिकाणी फीरवीत शेतातील झाेडपडीमध्ये लैंगीक अत्याचार केले़.

Man sentenced to life imprisonment for sexually abusing a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास

अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास

Next
ठळक मुद्देफेसबुकवर मैत्री करून केला लैंगीक छळआराेपीस पाेस्काे कायद्याने शिक्षा

अकाेला : बाेरगाव मंजु पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बहीरखेड येथील रहीवासी असलेल्या २५ वर्षीय युवकाने रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसाेबत फेसबुकवरुन मैत्री करीत तीचा विविध ठिकाणी लैंगीक छळ केल्याप्रकरणी अतीरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ डी़ पिंपळकर यांच्या न्यायालयाने आराेपीस मंगळवारी पाेस्काे व बलात्कार प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़. यासाेबतच तीन लाख ६० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास अतीरीक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले.

 बहीरखेड येथील रहीवासी विपुल विजय तेलगाेटे वय २५ वर्ष याने रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी असलेल्या एका १५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसाेबतच फेसबुकवरून मैत्री केली़.  याच मैत्रीमधून त्याने मुलीशी जवळीक साधत तीला भेटायला बाेलावले़. त्यानंतर मुलगी भेटली असता विपुल तेलगाेटे याने तीला विविध ठिकाणी फीरवीत शेतातील झाेडपडीमध्ये लैंगीक अत्याचार केले़. ११ मार्च २०१८ पासून मुलगी बेपत्ता असल्याने मुलीच्या वडीलांनी १२ मार्च २०१८ राेजी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली़. पाेलिसांनी तातडीने मुलीचा शाेध सुरु केला असता तीचे माेबाइल लाेकेशन या युवकाच्या शेतात बहीरखेड येथे आढळले़. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलीचा सुटका करीत तीला अकाेल्यात आणले़. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन आराेपी विपुल विजय तेलगाेटे याच्याविरुध्द रामदास पेठ पाेलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३५अ, ३७६ व पाेस्काे कायद्याच्या कलम ३, ४, ५, ६, ७, ८, ११, १२ अन्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणाचा तपास पीएसआय स्वाती इथापे यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले़. अतीरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ डी़ पिंपळकर यांच्या न्यायालयाने सात साक्षीदार तपासल्यानंतर समाेर आलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे आराेपी विपुल तेलगाेटे यास पाेस्काे व बलात्कार प्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़. यासाेबतच तीन लाख ६० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास अतीरीक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़ दंडातील अर्धी रक्कम पिडीतेला मदत म्हणूण देण्याचा आदेश आहे़. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले तर पैरवी अधिकारी म्हणूण प्रविण पाटील, बळीराम चतारे यांनी कामकाज पाहीले़.

Web Title: Man sentenced to life imprisonment for sexually abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app