शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Shocking! मोबाइल जमिनीवर उल्टा ठेवून स्कर्ट घातलेल्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ, तरूणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 12:46 IST

जयपूर महिला निर्भया स्क्वॉडने सोमवारी कारवाई करत तरूणाला अटक केली. ज्यानंतर चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

राजस्थानच्या जयपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आमेर महालात परदेशी महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवताना एका तरूणाला पकडलं आहे. जयपूर महिला निर्भया स्क्वॉडने सोमवारी कारवाई करत तरूणाला अटक केली. ज्यानंतर चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

तरूण फारच हुशारीने आमेरमध्ये फिरायला आलेल्या महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवत होता. चौकशीतून समोर आलं की, तरूण जयपूर शहरात साधारण ७ ते ८ पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन असे अश्लील व्हिडीोओ बनवत होता. आमेर महालमध्ये सोमवारी एक तरूण शूजची लेस बांधत होता. असं करणं सामान्य बाब आहे. पण हा तरूण पुन्हा आपल्या शूजची लेस काढत होता आणि पुन्हा बांधत होता. तिथे साध्या वेशात तैनात असलेल्या निर्भया महिला स्क्वॉडच्या पोलिसकर्मीने जेव्हा त्याला असं करताना पाहिलं तर तिला तरूणाचं असं वागणं संशयास्पद वाटलं.

महिला पोलिसाने त्या तरूणावर नजर ठेवली आणि तिने जेव्हा  लक्ष देऊन पाहिलं तर तिला दिसलं की, तरूण जेव्हा शूजची लेस बांधत होता तेव्हा फोनचा कॅमेरा ऑन करून जमिनीवर ठेवत होता. हे तो तेव्हाच करत होता जेव्हा एखादी तरूणी स्कर्ट किंवा फ्रॉकमध्ये दिसत असेल. (हे पण वाचा : प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, पोलीस स्टेशनसमोरच दोन्ही परिवार आपसात भिडले)

तरूण त्यांच्या अंडरगारमेंट्सचे अश्लील व्हिडीओ बनवत होता. निर्भया स्क्वॉडच्या पोलीस प्रेमलता यांनी ही बाब त्या तरूणीला सांगितलं तर तिलाही धक्का बसला. तिचा अश्लील व्हिडीओ कुणीतरी बनवला आणि तिला खबरही लागली नाही.

पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी तरूण अडीच महिन्याआधी माउंट आबूला फिरायला गेला होता. यावेळी त्याची ओळख दोन तरूणांसोबत झाली होती. त्यांनीच याला अशाप्रकारे अश्लील व्हिडीओ बनवण्याबाबत सांगितलं. त्यांच्याकडून माहिती घेऊनच तरूण जयपूरमद्ये तरूणींचे अश्लील व्हिडीओ बनवू लागला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी