शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांची तीन मुलींसह विष खाऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:23 IST

मुलींना जेवणातून विष देऊन स्वत:देखील केली आत्महत्या

वाराणसी: जुगारी वडिलांमुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्यानं एका पित्यानं तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.वाराणसीतल्या लक्सा भागात राहणारा दीपक कुमार कपडे विकण्याचं काम करायचा. त्याच्या कुटुंबात पत्नीसह निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) असे चार सदस्य होते. दीपक आयपीएलच्या सामन्यांवरील सट्ट्यात सतत पैसे हरत होता. त्याची पत्नी माहेरी गेल्यानं तिला याबद्दलची कल्पना नव्हती. काकांनी त्यांच्या तीन मुलींना काहीतरी खायला दिल्याचं दीपक कुमार यांच्या पुतणीनं सांगितलं. 'काकांच्या तीन मुली अंगणात झोपल्या होत्या. काही वेळानं काका तिथे आले आणि त्यांना आत घेऊन गेले. त्यानंतर ते आजीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागले. काही वेळानं त्यांची छोटी मुलगी रिया आजीजवळ गेली आणि वडिलांनी काहीतरी खायला दिल्याचं सांगू लागली. त्यावेळी काकांनी काहीतरी बहाणा सांगून शौचालयात गेले आणि त्यानंतर तिन्ही मुलींना उलट्या सुरू झाल्या,' असं दीपक यांची पुतणी साक्षीनं सांगितलं. तीन मुलींसोबतच दीपक यांनादेखील उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना कबीरचौरा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. त्यामुळेदेखील तो तणावाखाली होता, असं शेजारच्यांनी सांगितलं. आयपीएलवरील सट्ट्यात सतत हरल्यानं दीपक कर्जबाजारी झाला होता. दीपकनं मुलांच्या जेवणात विष कालवलं आणि स्वत:ही विष घेतलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याIPLआयपीएल