शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! आधी अरेंज मॅरेज, मग चार दिवसात लव्ह मॅरेज, दोन्ही पत्नींना ठेवलं वेगवेगळं; झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:16 IST

तरूण महिन्यातील 15 दिवस आपल्या पहिल्या पत्नी राहत होता आणि दुसरे 15 दिवस आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. हे साधारण 1 वर्ष चालू होतं.

यूपीच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने केवळ एका आठवड्यातच दोन लग्ने केली. पहिलं लग्न त्याने अरेंज मॅरेज केलं आणि चार दिवसांनी आपल्या प्रेयसीसोबत लव्ह मॅरेज केलं. इतकंच नाही तर तरूणाने आपल्या दोन्ही पत्नींना केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या घरात ठेवलं.

तरूण महिन्यातील 15 दिवस आपल्या पहिल्या पत्नी राहत होता आणि दुसरे 15 दिवस आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. हे साधारण 1 वर्ष चालू होतं. हळूहळू पहिल्या पत्नीला पतीवर संशय येऊ लागला होता. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे.

प्रेयसीला भाड्याच्या घरात ठेवलं

मुजफ्फरपूरच्या दामूचक भागात राहणाऱ्या विकास कुमारने गेल्यावर्षी 25 एप्रिलला एका तरूणीसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. पण त्याचं एका दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. दरम्यान पहिल्या लग्नाच्या चार दिवसानंतरच त्याने त्याच्या प्रेयसीसोबतही लग्न केलं. प्रेयसीने लग्नाची माहिती तिच्या घरी दिली नव्हती. त्याने प्रेयसीला एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं.

हुंड्यांसाठी पत्नीला त्रास

पहिल्या पत्नीने विकासवर हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पहिल्या पत्नीने सांगितलं की, लग्नावेळी मोठी रक्कम घेऊनही विकास तिला पुन्हा पुन्हा पैशांसाठी त्रास देत होता. तो माहेरी जाऊन पैसे आणण्याचं बोलत होता. यावेळी त्याने 5 लाख रूपये मागितले होते. ती म्हणाली की, विकास जास्त वेळ घरी राहत नव्हता. यामुळे तिला विकासच्या वागण्यावर संशय आला होता. नंतर हळूहळू खुलासा झाला की, विकासने दुसरंही लग्न केलं आहे.

शाळेपासून होतं प्रेम

दोन लग्नांबाबत विकास म्हणाला की, त्याचं पहिलं लग्न त्याच्या कुटुंबियांनी त्याला न विचारता ठरवलं होतं. तर दुसरी पत्नी त्याच्यासोबत शाळेत शिकत होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पहिलं लग्न आपल्या मनाप्रमाणे न झाल्याने त्याने चार दिवसातच दुसरं लग्न केलं होतं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न