शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

'अनैतिक संबंधा'च्या संशयावरून एकाला जमिनीत ४०० फूट खाली गाडलं, आता मिळाली जन्मठेपेची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:53 IST

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता.

गुजरातच्या भूजमध्ये गुरूवारी कोर्टाने १९ वर्षीय एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिघांपैकी एका दोषीला संशय होता की, मृत व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यानंतर दोषीने आपल्या २ साथीदारांसोबत मिळून पीडित व्यक्तीची कुऱ्हाडीने तुकडे करून हत्या केली.

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता. नंतर काही दिवसांनी रामला संशय आला की, देवांग आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहे. यानंतर दोषी खेमराज आणि नारानने देवांगला रामच्या पत्नीला न भेटण्याची धमकीही दिली. पण देवांगने काही ऐकलं नाही. त्यानंतर रामने त्याच्या साथीदारांसोबत मिळून देवांगची हत्या करण्याचा निर्णय घेतला. (हे पण वाचा : मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले)

तिन्ही दोषींनी देवांगला मारण्याचा प्लॅन केला. त्यांच्या प्लॅननुसार, १२ फेब्रुवारी २०१८ ला देवांगला शेतात भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर देवांग आपल्या आई-वडिलांना सांगून बाहेर पडला. तो म्हणाला की, काही कामानिमित्त बाहेर जात आहे. तो उद्या सकाळी परत येईल.

काय झालं त्या दिवशी?

जेव्हा देवांग शेतात पोहोचला तेव्हा राम त्याला तलावाकडे घेऊन गेला. तिथे खेमराज आणि नारान त्याची वाट बघत होते. तिथे पोहोचल्यावर रामने देवांगला जमिनीववर पाडले आणि तिघांनी त्याला दोराने बांधले. त्यानंतर तिघांनी देवांगला निर्दयीपणे जीवे मारले. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह फेकण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या)

दोषींनी देवांगचा मृतदेह बोअरवेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण बोअरवेलचं तोंड लहान असल्याने त्यात तो त्याला टाकता येऊ शकत नव्हतं. त्यानंतर ते शेजारच्या शेतातून कुर्हाड घेऊन आले आणि देवांगचे पाच तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये टाकले.

जेव्हा दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी २०१८ ला देवांग आपल्या घरी परतला नाही तर त्याच्या वडिलांनी गांडवीमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. नंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सच्या आधारावर राम, खेमराज आणि नारन यांना अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच मृतदेह कुठे लपवला हेही सांगितले. ४०० फूट खोल बोअरवेलमधून देवांगचा मृतदेह काढण्यासाठी ६ दिवस लागले होते. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी