शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न; पतीनं केले त्याच्या गुप्तांगाचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 4:58 PM

धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या गुप्तांगाचे तुकडे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. युक्रेनच्या खारकिव प्रांतात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा एका हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली. शेवचेन्कोवो गावातील २७ वर्षांचा दिमित्री स्पास्किन त्याच्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मित्रांना भेटायला गेला होता. स्पास्किनची पत्नी रात्री १ च्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडली. यानंतर दहा मिनिटांत स्पास्किनदेखील तिथून निघाला. यावेळी रस्त्यात दिमित्री इनचेन्को नावाच्या एका २५ वर्षीय तरुणानं त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. इनचेन्कोनं आधी स्पास्किनच्या पत्नीची छेड काढली. मात्र तिनं त्याकडे दुर्लक्ष करताच त्यानं तिचा चेहरा झाकला आणि झुडूपात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार मागून येत असलेल्या स्पास्किननं पाहिला. 'त्यानं माझ्या पत्नीचा गळा धरला होता. तो तिला घेऊन झुडूपात गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करत होता,' अशी माहिती स्पास्किननं पोलिसांना दिली. हा प्रकार पाहताच स्पास्किन इनचेन्कोच्या दिशेनं धावला. त्यानं त्याच्याकडे असणाऱ्या स्विस चाकूनं इनचेन्कोच्या गुप्तांगावर वार करत त्याचे तुकडे केले. गुप्तांगावर वार झाल्यानंतर इनचेन्को किंचाळला. त्याच्या आवाजामुळे परिसरात राहणारे नागरिक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन केला. दरम्यान जखमी झालेल्या इनचेन्कोनं रुग्णालय गाठलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिमित्री स्पास्किनला अटक केली आहे. त्यानं त्याच्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कार