अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 20:49 IST2021-05-17T20:48:52+5:302021-05-17T20:49:00+5:30
Crime News : दुर्गेश राजेश पिछेल (३६, रा. फ्रेजरपुरा अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
अकोला : अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाच महिन्यापूर्वी पळवून अकोला येथे आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ३६ वर्षीय आरोपी हा विवाहित असून, त्याच्याविरुद्ध एका वर्षापूर्वीसुद्धा अमरावती येथील पीडितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुर्गेश राजेश पिछेल (३६, रा. फ्रेजरपुरा अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयामसोर हजर केले असता, त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीचे पीडितेशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने एक वर्षापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २ जानेवारी २०२१ रोजी फूस लावून पळविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास करीत असताना मुलगी व आरोपी अकोला येथे असल्याचे फोन लोकेशन अमरावती पोलिसांना ट्रेस झाले. त्यानुसार पोलिसांनी अकोला येथे येऊन आरोपीला व मुलीला ताब्यात घेतले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, (२),(एन) सहकलम ४,६ पोक्सोप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.