शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मामी-भाच्याची लव्हस्टोरी... दोनदा घरातून पळाले; मामाने अपमान करताच रचला भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:43 IST

कौशांबी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात भाचा एवढा वेडा झाली की त्याने थेट मामाचा काटाच काढला.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात भाचा एवढा वेडा झाली की त्याने थेट मामाचा काटाच काढला. चुलत भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने मामाची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला आहे आणि तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीपान घाट पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरपूर बजहा गावात ही घटना घडली आहे. झाडाखाली मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. महेंद्र प्रजापती उर्फ ​​छोटू असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं.  पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले. कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्यानंतर आकाश, रोहित आणि विजय या तिघांना अटक करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान आरोपी आकाशने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, महेंद्र हा त्याचा मामा होता. आकाश म्हणाला की, तो त्याच्या मामीवर प्रेम करत होता. तो आधीच दोनदा तिच्यासोबत घरातून पळून गेला होता, ज्यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी पंचायतीद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये मामाने आकाशला खूप शिवीगाळ केली आणि अपमान केला. या प्रकरणामुळे आकाशच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली.

आकाशने त्याचा चुलत भाऊ रोहित आणि मित्र ​​विजयसोबत मिळून मामाची हत्या करण्याचा कट रचला. त्या तिघांनी महेंद्रला एका निर्जन ठिकाणी बोलावलं आणि त्याच्या डोक्यात वार करून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला, जेणेकरून हे प्रकरण अपघातासारखे वाटेल. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल, कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस