शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ बनवून धमकी,धर्मांतर करुन लावले लग्न; बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 07:36 IST

Jalgaon Crime News : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती  कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

जळगाव : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती  कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका कथित मौलवी बाबाने नाशिक येथील  महिलेस अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मांतर करुन लग्नही लावले. बाबाच्या वासनांध  कृत्यांची आपबीती पीडीत महिलेने बुधवारी सोशल मीडियावर मांडली. याप्रकरणी  बाबासहचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरी दिगर ता. जामनेर येथे ही घटना उघडकीस आली आहे.

अल्ताफ मोहसीन मनियार उर्फ अलीबाबा (रा.नेरी दिगर ता.जामनेर) असे या  कथित बाबाचे  नाव आहे. त्याच्यासह ताहेर रिहासत शेख, सोहेल अंसारी (सर्व रा. मालेगांव) व श्रुती दिलीप  सतडेकर (रा. मुंबई) अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सांगितलेल्या आपबीतीनुसार, सन २०१७ मध्ये तिला एका महिलेने अलिबाबा याचा मोबाईल नंबर दिला. तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो,  म्हणत त्याने ५० हजार रुपये मागितले. महिलेने त्यास होकार दिला. त्यानंतर अल्ताफ हा या  महिलेस मालेगाव येथून नेरी येथील आश्रमात घेऊन आला. तिथे त्याने आपणास संमोहित  केले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने आपणास अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी  देण्यास सुरुवात केली. तसेच धर्मांतर करुन लग्नही लावले आणि त्याने पहिली पत्नी व मुलगा  असल्याचे लपविले.दुसरीकडे आपणास धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये  उकळले. आपण त्याचे घर सोडून माहेरी निघून गेले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यास जाणार  त्याआधीच बाबाने आपल्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका  महिलने धमकी दिली. याबाबत जामनेर पोलिसात दि. ६ ऑक्टोबर रोजी भादंवि कलम ३८४, ३८५ (खंडणी), ४९४  (पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न), ३२३ (मारहाण) आणि ५०६ (३४)(धमकी)या  प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अंबादास पाथडकर, हेकॉ अरविंद मोरे,विनोद  पाटील तपास करीत आहे." अल्ताफ मनियारने फिर्यादी महिलेसोबत लग्न केले आहे. सन २०१७ पासून ते मालेगांव  येथे राहतात. २०१९ मध्ये तो १५ दिवसांसाठी नेरी येथे आला होता. दोघेही नेरी येथे राहत  नाही.फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांचे पथक माहिती  घेण्यासाठी मालेगांव येथे पाठविले होते. चौकशी सुरु आहे.- प्रताप इंगळे (पोलीस निरीक्षक, जामनेर)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव