शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

NIAची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक, काही वस्तू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 21:36 IST

NIA Ation in Pune : या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून काही कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. 

पुणे शहरातील वानवडी परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. ‘ISIS’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने एका घरावर छापेमारी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून काही कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. 

गेल्या तीन दिवसांपासून एनआयएचे पथक पुण्यात तपास करत असून अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. तल्हा लियाकत खान असं अटक केलेल्या 38 वर्षीय संशयित आरोपीचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरात वास्तव्याला होता. आरोपी तल्हा खानचे दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तल्हा खान याच्या वानवडी येथील घरावर छापेमारी केली. NIA च्या पथकाने तल्हा खान याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

वानवडी परिसरात तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे. इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. ‘इसिस’शी संबंध असल्याचा संशय तसेच देशभरात घातपात कारवायाच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतून जैनब सामी वाणी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. जामीयानगर, दिल्ली) या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली हाेती. हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. त्यांच्या चौकशीत चौघा जणांची नावे निष्पन्न झाली होती.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPuneपुणेArrestअटकISISइसिस