शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अमेरिकन मॉडेलच्या हत्येचा तपास, महाराष्ट्र पोलीस प्रागमध्ये वॉन्टेटच्या प्रत्यार्पणासाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:06 IST

Murder Case Of US Model : अमेरिकन मॉडेल लिओना स्विंदरस्की (३३) हिच्या हत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने २००३ मध्ये दोघांची निर्दोष मुक्तता केली होती.

ठाणे :  फेब्रुवारी 2003 मध्ये अमेरिकन मॉडेलच्या हत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीच्या प्रत्यार्पणासाठी महाराष्ट्रातील पोलीस पथक चेक प्रजासत्ताकमधील प्राग येथे गेले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

विशेष म्हणजे या खटल्यातील आरोपीच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या अपीलवरील सुनावणीसाठी हजर न राहिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अमेरिकन नागरिक प्रणेश देसाई आणि सध्या प्रागमध्ये असलेला त्याचा मित्र विपुल पटेल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे पटेलला पकडण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखालील एक पथक शनिवारी प्रागला रवाना झाले, असे काशिमीरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.अमेरिकन मॉडेल लिओना स्विंदरस्की (३३) हिच्या हत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने २००३ मध्ये दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. देसाई आणि स्विंदरस्की हे रिलेशनशिपमध्ये होते आणि मे २००३ मध्ये लग्न करणार होते. ७ फेब्रुवारी २००३ रोजी, हे दोघे मुंबईतील विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेचच, मॉडेल बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा भागात महामार्गावर सापडला, असे अधिकाऱ्याने सांगितले.त्यानंतर पोलिसांनी असा आरोप केला की, देसाईने आपल्या मित्र पटेलची मदत घेऊन मॉडेलची हत्या करून तिच्या विमा रकमेचा दावा केला होता. विमानतळावर जेव्हा मॉडेल कॅबमध्ये बसली तेव्हा पटेलने मॉडेलला मारण्यासाठी दोन लोकांना भाड्याने घेतल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर मृतदेह महामार्गावर टाकण्यात आला. 

देसाईला या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली होती, तर पोलीस पटेलचा शोध घेत होते आणि इंटरपोलने नंतर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि इंटरपोलशी समन्वय साधला आणि नंतर आरोपीला पकडण्यासाठी प्रागला रवाना झाले. ते या आठवड्याच्या शेवटी परत येण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेAmericaअमेरिका