शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शारिरीक संबंध प्रस्थापित केले तर चित्रपटांत काम देईन, दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे मागितले 'इंटिमेट फोटो'; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:23 IST

पोलिसांनी एका दिग्दर्शकाला अटक केली आहे. चित्रपटात कास्ट करण्याच्या बदल्यात त्याने एका अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.

मुंबई- मायानगरी मुंबईत अनेक तरुण-तरुणी स्टार बनण्याचे स्वप्न घेऊन येतात. मात्र, अनेक वेळा अशाही घटना घडतात, की त्यांचा सामना वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी होतो. आता बॉलिवूडमधून कास्टिंग काउचचे आणखी एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे एका दिग्दर्शकाला पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटात कास्ट करण्याच्या बदल्यात त्याने एका अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.  एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कास्टिंग काउच प्रकरणी पोलिसांनी टिटवाळा भागातून एका दिग्दर्शकाला अटक केली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर धनंजय लिगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे इंटिमेट फोटोंची मागणी केली होती. एवढेच नाही तर, जेव्हा अभिनेत्रीने रिलेशनशिपला नकार दिला, तेव्हा त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

यानंतर अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शक या दोघांचीही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशा प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही अथवा असे प्रकरण समोर येण्याचीही ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेवेळा असे घडले आहे.

गेल्या काही दिवसांत, अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी कास्टिंग काउचसंदर्भात उघडपणे भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री सुरवीन चावलानेही कास्टिंग काउच आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्यासंदर्भात खुलासा केला होता. जेव्हा आपण चित्रपटांमध्ये येणार होतो, तेव्हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपल्याला आपल्या शरीराच्या अवयवांच्या साईजसंदर्भात प्रश्न केले होता, असे तिने म्हटले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईcinemaसिनेमा