शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Giri Death : "मुलीसोबत फोटो मॉर्फ्ड करून मला ब्लॅकमेल केलं गेलं"; नरेंद्र गिरींच्या 'सुसाईड नोट'मुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:18 IST

Mahant Narendra Giri Suicide Note : नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे.

नवी दिल्ली - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri Death Case) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केला. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे. तसेच त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी "एका मुलीसोबत त्यांचा फोटो मॉर्फ्ड करून" त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आता समोर आली आहे. 

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या मृत्यूसाठी आनंद गिरी, अद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी हे जबाबदार आहेत. मी प्रयागराजच्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की, माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या या लोकांवर कारवाई करा. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मला कळलं की आनंद गिरी हे माझा एका मुलीसोबतचा मॉर्फ्ड फोटो व्हायरल करणार होते. आनंदने मला सांगितलं की एकदा हे पसरलं की, तुम्ही किती लोकांसमोर तुमचं निर्दोषत्व सिद्ध कराल?’ मी आतापर्यंत माझं आयुष्य सन्मानाने जगलो आहे आणि भविष्यात मी ज्या अपमानाला सामोरे जाईन त्यानंतर त्या आरोपांसह मी जगू शकत नाही" असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

"काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले"

नरेंद्र गिरी यांनी 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार होतो पण हिंमतच झाली नाही असं म्हणत आपल्या सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर खाली आपलं नाव आणि सही देखील केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरू होता. महंत गिरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. महंतांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली. त्यासोबत सल्फासच्या गोळ्या सापडल्या. सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, अद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप आहे. संपूर्ण आयुष्यात कधीही अंगाला काळा डाग लागू दिला नाही. पण काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दु:खी होते.

शिवसेनेकडून सीबीआय तपासाची मागणी

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक