शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

हनी ट्रॅप कांड : बड्या हस्तींची नावे समोर येणार?, आरोपी सरकारी साक्षीदार होण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:55 IST

आरोपींना अनेक एस्कॉर्ट सर्व्हिस पोर्टल्सवर स्वत:चा तपशील दिला आहे

भोपाळ : मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमधील खुलाशाने अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल असणाऱ्या या प्रकरणाशी संबंधीत 4000 फाईल तपास यंत्रणांना मिळाल्या आहेत. आता तर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. 

हनी ट्रॅप प्रकरणी पाच आरोपींसोबत अटक करण्यात आलेल्या 18 वर्षीय आरोपी मोनिका यादव हिने सरकारी साक्षीदार बनण्यास तयारी दर्शविली आहे. या प्रकरणात मोनिका यादव मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे. 

मोनिकाच्या वडिलांनी मानवी तस्करी प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मोनिका सरकारी साक्षीदार बनण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंदोर महानगरपालिकेचे अभियंता हरभजन सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोनिकाशिवाय आरती दयाल, श्वेता स्वप्नील जैन, श्वेता विजय जैन, बरखा सोनी आणि ड्राव्हर ओमप्रकाश याला अटक केली होती. अभियंत्याने आरोप लावला होता की, एका आरोपी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करत आपत्तीजनक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओच्या आधारावर तिच्याकडून तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात येत आहे. 

मोनिकाला बनविले 'मोहरा'पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, ही गँग श्वेता जैन चालविते. मोनिका सरकारी साक्षीदार म्हणून तयार झाल्यास श्वेता जैन कशाप्रकारे या प्रकारे हे रॅकेट चालवत होत्या, ते समोर येईल. मोनिकाला मोहरा बनवून आरोपींनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे. 

चार तास चौकशीमध्य प्रदेश सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीने इंदोरमध्ये जाऊन मोनिकाची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी जवळपास चार तास मोनिकाची चौकशी करण्यात आली. सुत्रांनी सांगितले की, आता मोनिका आणि तिचे वडील यांना संरक्षण देण्यात येणार आहे. 

डार्ड डिस्कच्या चौकशीत एसआयटीभोपाळमध्ये आपोरी आरती दयाल हिच्या घरी जाऊन पुरावे गोळ्या करण्यासाठी एसआयटी बुधवारी रात्री उशिरा इंदोहून रवाना झाली आहे. मोनिकाच्या चौकशीदरम्यान हनी ट्रॅप प्रकरणात आरती संदर्भात एसआयटीला माहिती मिळाली आहे. यात तिने हार्ड डिस्कचा सुद्धा उल्लेख केला आहे. या हार्ड डिक्समध्ये अनेक व्हिडीओ आहेत. 

चौकशीदरम्यान असे समोर आले...1) आरोपींना अनेक एस्कॉर्ट सर्व्हिस पोर्टल्सवर स्वत:चा तपशील दिला आहे. अनेक मोबाईल अॅप्सवर सुद्धा त्यांनी आपल्याविषयी माहिती दिली होती.2) क्लाइंट्ससोबत आरोपींनी आपली प्रोफाइल्स शेअर केली आहे. एवढेच नाही, तर गोवा, मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आरोपींचे ये-जा होते.3) आरोपी मुख्यत: मोठ्या घरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडविण्याचा प्रयत्न करत होते. खासकरुन श्रीमंत आणि लग्न झालेल्या लोकांना फसवून ब्लॅकमेल केले जात होते. 4) हे सर्व आरोपी एक दिवसासाठी 10 ते 40 हजारपर्यंत चार्ज घेत होते आणि महागड्या हॉटेलमध्ये राहत होते.  

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटsex crimeसेक्स गुन्हाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी