शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच कुटुंबातील आठ जणांची हत्या, गाढ झोपेत कुऱ्हाडीने वार; मध्य प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:48 IST

बोदल कछार या गावात आठ कुटुुंबीयांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली

अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ: मनोरुग्ण असलेल्या एका व्यक्तीने गाढ झोपेत असलेल्या आठ कुटुुंबीयांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे घडली. या हत्याकांडाबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.

बोदल कछार या गावात घडलेल्या या हत्याकांडामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दिनेश गोंड (२६) याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्याचा गेल्या २१ मे रोजी विवाह झाला होता. त्याने आपली पत्नी, आई, बहीण, भाऊ, वहिनी, तीन लहान मुले अशा आठ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. दिनेशने आपल्या भाच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण जखमी झालेला भाचा त्याच्या तावडीतून निसटला व तिथून पळून गेला. मृतांमध्ये चार वर्षे आणि एक वर्षाच्या दोन मुलींचाही समावेश असून त्या दिनेशच्या भाच्या होत्या.

त्यानेही घेतला गळफास

  • या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखोर दिनेशचा शोध सुरू केला. तो घरापासून जवळच असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
  • त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष खत्री यांनी दिली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हत्याकांड झालेल्या गावाचा मुख्यमंत्री दौरा करण्याची शक्यता

मध्य प्रदेशच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी खात्याच्या मंत्री संपतिया उइके यांनी हत्याकांड घडलेल्या बोदल कछार या गावी जाऊन दिनेशच्या इतर नातेवाईकांची व स्थानिक नागरिकांची भेट घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिले. यादव हे या गावाचा दौरा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश