शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या मुलानं दारू पिऊन चालवली कार, सोशल मीडिया चॅलेंजचा VIDEO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 20:21 IST

Drunk and Drive Challenge:  या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये ड्रायव्हर पूर्णपणे नशेत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील सीहोर येथे, इंदूर येथील एका व्यवसायीकाच्या कारला मागच्या बाजूने वारंवार धडक देण्याच्या आरोपाखाली दारूच्या नेशत असलेल्या एका अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य भाजपने केलेल्या आरोपानुसार, हल्लेखोर चालक हा काँग्रेसचेआमदार तथा माजी मंत्री हुकूम सिंह कराडा यांचा मुलगा होता. 

व्हायरल व्हिडिओतून झाला खुलास -या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये ड्रायव्हर पूर्णपणे नशेत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यातील कारच्या नंबरवरून, ही कार शाजापूरचे हुकूम कराडा यांचा मुलगा रोहिताप सिंह याची असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात बोलताना एक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्रीच्या समारास घडली. यावेळी व्यापारी दिनेश आहूजा (40) आणि त्याचा सहकारी भोपाळवरून इंदूर येथे जात होत.

गुन्हा दाखल -येथील आष्टा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल यादव यांनी  दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष विष्णू दत्त शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, की संबंधित आरोपी हा काँग्रेसचे माजी मंत्री  हुकूम सिंह कराडा यांचा मुलगा आहे. कुठल्याही परिस्थितीत गुंडाराज खपवून घेतले जाणार नाही. तसेच या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असेही विष्णू दत्त शर्मा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदारcongressकाँग्रेसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह