मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या मुलानं दारू पिऊन चालवली कार, सोशल मीडिया चॅलेंजचा VIDEO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:13 PM2022-05-24T18:13:40+5:302022-05-24T20:21:52+5:30

Drunk and Drive Challenge:  या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये ड्रायव्हर पूर्णपणे नशेत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Madhya Pradesh Congress mlas son drives car after drinking alcohol, Social Media Challenge VIDEO VIRAL | मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या मुलानं दारू पिऊन चालवली कार, सोशल मीडिया चॅलेंजचा VIDEO VIRAL

मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या मुलानं दारू पिऊन चालवली कार, सोशल मीडिया चॅलेंजचा VIDEO VIRAL

googlenewsNext

मध्य प्रदेशातील सीहोर येथे, इंदूर येथील एका व्यवसायीकाच्या कारला मागच्या बाजूने वारंवार धडक देण्याच्या आरोपाखाली दारूच्या नेशत असलेल्या एका अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य भाजपने केलेल्या आरोपानुसार, हल्लेखोर चालक हा काँग्रेसचेआमदार तथा माजी मंत्री हुकूम सिंह कराडा यांचा मुलगा होता. 

व्हायरल व्हिडिओतून झाला खुलास -
या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये ड्रायव्हर पूर्णपणे नशेत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यातील कारच्या नंबरवरून, ही कार शाजापूरचे हुकूम कराडा यांचा मुलगा रोहिताप सिंह याची असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात बोलताना एक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्रीच्या समारास घडली. यावेळी व्यापारी दिनेश आहूजा (40) आणि त्याचा सहकारी भोपाळवरून इंदूर येथे जात होत.

गुन्हा दाखल -
येथील आष्टा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल यादव यांनी  दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष विष्णू दत्त शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, की संबंधित आरोपी हा काँग्रेसचे माजी मंत्री  हुकूम सिंह कराडा यांचा मुलगा आहे. कुठल्याही परिस्थितीत गुंडाराज खपवून घेतले जाणार नाही. तसेच या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असेही विष्णू दत्त शर्मा यांनी म्हटले आहे.

Web Title: Madhya Pradesh Congress mlas son drives car after drinking alcohol, Social Media Challenge VIDEO VIRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.