शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! जवळीक साधली, अश्लिल व्हिडीओ बनवला आणि दिराने वहिनीवर तीन वर्षे बलात्कार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:56 IST

Crime News: दीर-वहिनीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. एका दिराने त्याच्या वहिनीला ब्लॅकमेल करत तब्बल तीन वर्षे तिच्यावर बलात्कार केला.

पलवल (हरियाणा) - हरियाणामधील पलवल जिल्ह्यात दीर-वहिनीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे एका दिराने त्याच्या वहिनीला ब्लॅकमेल करत तब्बल तीन वर्षे तिच्यावर बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने हिंमत करून दिराविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली. मात्र अद्यापतरी आरोपी दीर फरार आहे. (made pornographic videos and brother-in-law raped his Sister-in-law for three years)

या घटनेबाबत ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार यांनी सांगितले की, २७ वर्षीय पीडित महिलेने तिचे पतीसोबत मतभेद असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून तिचा दीर अमर याचे तिच्या घरी येणेजाणे होते. दरम्यान, २०१८ मध्ये अमरने पीडित महिला आणि तिच्या पतीमधील मतभेदांचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अमरने तिचा व्हिडीओ बनवला असल्याचे सांगत पीडित महिलेला भीती घातली. तसेच तेव्हापासून हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तो तिच्यावर बलात्कार करू लागला.

दरम्यान, १५-२० दिवसांपूर्वी अमर याने पीडितेला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली. याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर अमरने सांगितले की, आतापर्यंत केवळ ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली आहे. नंतर व्हिडीओ रेकॉर्डिंगही पाठवेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर पीडितेने अमरविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. आरोपी दिराला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सध्यातरी आरोपीचा शोध सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाIndiaभारत