शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 19:56 IST

भिगवण, बारामती परिसरातील दरोडेखोरांनी लुटलेले दोन किलो सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हडप करायचे आणि मोटारीतून पसार व्हायचे, असा कट आखला...

पिंपरी : व्यवसायात नुकसान झाल्याने दरोडेखोरांनी लुटलेले सोने लुबाडून पळून जाण्यासाठी दोघा जणांनी टेस्ट ड्राइव्ह च्या बहाण्याने आलिशान मोटार पळवून नेली. मात्र, निगडी पोलिसांनी केलेल्या तपासामुळे त्यांचा कट फसला. तळेगाव - दाभाडे येथून दोघांनाही जेरबंद करण्यात आले.     दत्तात्रय आण्णा डुबे (वय ३१, रा. मोरेवस्ती, चिखली, मुळ - करमाळा, जि. सोलापूर) आणि दत्तात्रय पांडुरंग रंदवे (वय २८, सध्या रा. इंदोरी, ता. मावळ,  मुळ - करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार यांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी मोटार विक्रीचा व्यवसाय करणारया उमेश चौधरी यांची १४ लाख रुपये किंमतीची आलिशान मोटार टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने २८ मार्च रोजी काळभोरनगर येथून पळवून नेली होती. चोरीला गेलेली ही मोटार घेऊन आरोपी तळेगाव - दाभाडे म्हाळसकरवाडी येथे पैसा फंड काच कारखान्यासमोर येणार असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता व्यवसायात नुकसान झाले. पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे भिगवण, बारामती परिसरातील दरोडेखोरांनी लुटलेले दोन किलो सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हडप करायचे आणि मोटारीतून पसार व्हायचे, असा कट आखल्याची कबुली त्यांनी दिली. मोटार चोरल्यानंतर दोन दिवसांनी तिला बनावट नंबर प्लेट लावून डुबे आणि रंदवे हे मोटारीतून भिगवण येथे जाऊन आल्याचेही त्यांनी पोलीसांना सांगितले.    ही कारवाई  वरिष्ठ निरीक्षक सतिश पवार, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, उपनिरीक्षक संतोष घाडगे, कर्मचारी सतिश ढोले, किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, प्रवीण मुळुक, सोमनाथ दिवटे, विलास केकाण यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी